वायू प्रदुषणामुळे तुमच्याही डोळ्यांना त्रास होतोय? मग अशाप्रकारे घ्या काळजी
वायुप्रदूषण ही केवळ आपल्या फुप्फुसांसाठीच नाही, तर आपल्या डोळ्यांसाठीही एक गंभीर समस्या आहे. “प्रदूषणात वाहने, कारखाने आणि इंटेरिअर यांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश होतो, ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात,” असे डॉ. अंकिता सबरवाल, एमएस (ऑप्थॅल्मोलॉजी), सीनियर कन्सल्टंट, श्रीजीवन हॉस्पिटल, न्यू दिल्ली यांनी सांगितले.