तरुणांनांमध्येच हृदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण अधिक का आहे?
Heart Attack in Young Adults : प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि चित्रपट निर्माता सुदीप पांडे याचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्याची प्राणज्योत मालवली. सुदीप पांडे याच्या निधनाची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिली. पण, या धक्कादायक घटनेमुळे भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.