सतत पोट फुगल्यासारखं वाटतं का? मग आजच करा तुमच्या ‘या’ सवयीत बदल; जाणून घ्या डॉक्टरांचे मत
पोट फुगणे ही एक सामान्य पचन समस्या आहे, ज्याची कारणे विविध असू शकतात. दी इंडियन एक्स्प्रेसने डॉक्टर अक्षत चढ्ढा यांच्याशी संवाद साधून पोट फुगण्याची कारणे उलगडली आहेत. या यादीमध्ये जास्त वेळ बसणे, घट्ट कपडे घालणे, च्युइंगम खाणे ही प्रमुख कारणं नमूद केली आहेत; ज्यामुळे एखाद्याला वारंवार पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. तर या सवयींचा आपल्या आरोग्यावर कसा परिमाण होतो ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.