तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो हा परिणाम, तज्ज्ञ सांगतात…
फळं खाणं संतुलित आहारासाठी एक उत्तम पर्याय मानलं जातं. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का, की तुम्ही जरा जास्तच फळं खाता. कारण जसं प्रत्येक गोष्टीचं प्रमाण महत्त्वाचं आहे, तसंच फळंही जास्त खाल्ल्याने शरीरावर विशेषतः यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.