१५ दिवसातून एकदा अशा प्रकारे करा दुधाचे सेवन; पचनासही होईल मदत; वाचा डॉक्टरांचे मत
रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि गूळ पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते, असे आयुर्वेद अभ्यासक डॉक्टर डिंपल जांगडा सांगतात. दूध हे प्रथिने, बी१२, डी जीवनसत्त्वे पुरवते, तर गूळ पचन सुधारतो आणि विषारी पदार्थ बाहेर काढतो. मात्र, डॉक्टर श्वेता बिराली आणि फॉझिया अन्सारी यांच्या मते, या मिश्रणाचे कमी प्रमाणात सेवन करावे. कारण - गुळातील साखर आणि कॅल्शियम-लोहमुळे काही तोटे सुद्धा उद्भवू शकतात.