Flying with having cold can be dangerous to health can affect ears eardrum may rupture
1 / 31

सर्दी झाल्यास विमानाने प्रवास करणे ठरू शकते घातक! शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम

हेल्थ March 23, 2025

Travelling in Flight while having cold: विमान प्रवास करताना अनेकांना कान दुखण्याचा अनुभव येतो. परंतु सर्दी किंवा संबंधित ऍलर्जी असलेल्यांसाठी हा अनुभव अत्यंत वेदनादायक आणि तीव्र होऊ शकते.

Swipe up for next shorts
Ambadas Danve Serious Allegation
2 / 31

अंबादास दानवेंचा ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’, “मुंबई पोलीस बेटिंगला सहकार्य करत आहेत…”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई पोलिसांवर बेटिंगला सहकार्य केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुरावे म्हणून पेन ड्राइव्ह अध्यक्षांना दिली आहे. दानवे म्हणाले की, पाकिस्तानी खेळाडूंशी संपर्क ठेवून बेटिंग चालते आणि अनेक पोलीस अधिकारी यात सामील आहेत. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आणि सत्ताधारी मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप केले.

Swipe up for next shorts
Comedian Kunal Kamra
3 / 31

कुणाल कामरा म्हणाला होता पोलिसांना सहकार्य करणार, पण समन्स बजावूनही पोहचलाच नाही

कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर म्हटलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे चौकशीसाठी बोलावलं होतं, पण तो हजर राहिला नाही. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. कामराने माफी मागणार नसल्याचं सांगितलं असून पोलिसांना सहकार्य करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, तो चौकशीला हजर न झाल्याने आणखी एक समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे.

Swipe up for next shorts
Yawning too much means having health issues iron deficiency know expert advice
4 / 31

तुम्हाला सतत जांभया येतात का? मग ‘हे’ असू शकते गंभीर आजाराचे लक्षण, तज्ज्ञ सांगतात…

Excessive Yawning Health Issues: जांभई येणे ही बाब बहुतेकदा झोप किंवा कंटाळलेपणाशी संबंधित असते आणि ती तुमच्या मेंदूला तुमचे शरीर जागृत ठेवण्याच्या दृष्टीने मदत करते. पण, जर तुम्ही रात्रंदिवस, वारंवार जांभया देत असाल, तर ते अनेक आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, जास्त जांभया येणे हे हृदयरोग किंवा मानसिक आरोग्य समस्यांसारख्या अनेक आरोग्य समस्या दर्शवू शकते. पण, हे चिंतेचे कारण कधी बनते?

donald trump us ristrictions on venezuela crude oil
5 / 31

अमेरिकेनं इशारा दिला व्हेनेझुएलाला, परिणाम होणार भारतावर; २५ टक्के कर लागू होणार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल आयात करणाऱ्या देशांवर २५ टक्के Secondary Teriff लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो. भारताने व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल आयात पुन्हा सुरू केली असली तरी अमेरिकेच्या या निर्णयामुळे तेलाच्या दरवाढीची शक्यता आहे, ज्यामुळे भारतीय कंपन्यांसाठी चिंता वाढू शकते.

Kunal Kamra New Song Released
6 / 31

VIDEO : “हम होंगे….!” कुणाल कामराचं आणखी एक नवं खोचक गाणं

विनोदी कलाकार कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता "हम होंगे कामयाब" या गाण्याच्या चालीवर "हम होंगे कंगाल" हे नवं गाणं प्रसिद्ध केलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीच्या गाण्यामुळे शिंदे समर्थकांनी हॅबिटॅट क्लबची नासधूस केली होती आणि कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Sonu Sood wife Sonali Sood accident on Mumbai-Nagpur samruddhi highway
7 / 31

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात

अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ही घटना २५ मार्च २०२५ रोजी घडली. सोनाली या अपघातात जखमी झाली असून अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

devendra fadnavis supriya sule latest news
8 / 31

सुप्रिया सुळेंबाबत देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गंभीर दावा; जयकुमार गोरे प्रकरणातील आरोपी

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर खंडणीचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा दावा केला. फडणवीसांनी या प्रकरणात नेक्सस असल्याचे सांगितले आणि आरोपींनी कट रचल्याचे पुरावे सापडल्याचे नमूद केले. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj and Aurangzeb
9 / 31

“औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना ठार मारलं..”; हुसेन दलवाईंचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेब चर्चेत आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कसे हाल करून मारले हे दाखवले आहे. भाजप खासदार उदयनराजे यांनी औरंगजेबाची समाधी उखडण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजांना ठार मारल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

sanjay dutt second wife rhea pillai affair with Leander Paes
10 / 31

संजय दत्तच्या दुसऱ्या बायकोने लग्न न करताच प्रसिद्ध खेळाडूच्या बाळाला दिला जन्म अन्…

संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत राहिला. त्याने तीन लग्नं केली. पहिली पत्नी रिचा शर्मा, दुसरी रिया पिल्लई आणि तिसरी मान्यता दत्त. रिचाचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. रियाशी २००५ मध्ये घटस्फोट झाला. रिया फॅशन डिझायनर आहे. तिने लिएंडर पेससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहून मुलगी अयाना झाली. २०१४ मध्ये रियाने लिएंडरवर मारहाणीचे आरोप केले. सध्या रिया एकटीच मुलीचा सांभाळ करत आहे.

Kunal Kamra Kangana Ranaut
11 / 31

“विनोदाच्या नावाखाली…”, कंगना रणौत यांची संतप्त प्रतिक्रिया

विनोदी कलाकार कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांनी समन्स बजावला असून तो चौकशीला हजर राहिला नाही. यावर अभिनेत्री कंगना रणौत यांनी संताप व्यक्त केला आहे. न्यूज १८ शी संवाद साधताना कंगना म्हणाल्या, "माझं अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर त्याची मस्करी केली गेली. ज्या लोकांना स्वतःची इज्जतच सर्व काही आहे, त्यांची चेष्टा करणारे लोक कोण आहेत? ज्यांनी आयुष्यात काहीही केलं नाही."

us president donald trump
12 / 31

ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याची करामत; अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे चॅट झाले लीक; गोपनीय माहिती…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्याने येमेनमधील हवाई हल्ल्यांबाबतच्या गोपनीय चॅट ग्रुपमध्ये चुकून 'दी अटलांटिक'चे मुख्य संपादक जेफरी गोल्डबर्ग यांना अॅड केले. त्यामुळे संवेदनशील माहिती लीक झाली. व्हाईट हाऊसने ही चूक मान्य केली असली तरी ट्रम्प यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवली. या घटनेवर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे.

Natasa Stankovic on falling in love after divorce with hardik pandya
13 / 31

हार्दिक पंड्या-जास्मि वालियाच्या डेटिंगच्या चर्चांदरम्यान एक्स पत्नी नताशाचं मोठं विधान

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविक यांचा २०२४ मध्ये घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा असून ते त्याचा मिळून सांभाळ करत आहेत. घटस्फोटानंतर हार्दिकचं नाव जास्मिन वालियाशी जोडलं जात आहे. नताशा सध्या सिंगल असून पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. तिने 'ईटाईम्स'ला सांगितलं की, हे वर्ष नवीन अनुभव, संधी आणि प्रेमासाठी आहे.

prasanna Sankar and Dhivya Sankar
14 / 31

Prasanna Shankar : अब्जावधी डॉलर्सच्या कंपनीच्या मालकाला पत्नीने फसवलं, सोशल मीडियावर लिहिलेल्या करुण कहाणीने तुमचेही डोळे पाणावतील!

प्रसन्ना शंकर, अब्जावधी डॉलर्सच्या कंपनीचे सहसंस्थापक, यांनी त्यांच्या पत्नी दिव्या शशिधरवर विवाहबाह्य संबंध आणि मुलाला अमेरिकेत लपवून ठेवण्याचा आरोप केला आहे. दिव्याने हे आरोप फेटाळून लावले असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रसन्ना यांनी एक्सवर त्यांच्या कहाणीची माहिती दिली आहे. ते सध्या चेन्नई पोलिसांपासून पळत असून तामिळनाडूच्या बाहेर आहेत.

Poonam Dhillon did Extra Marital Affair to teach lesson husband
15 / 31

पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजताच पूनम ढिल्लों यांनीही केलेलं अफेअर, नंतर जे घडलं…

७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी १५ व्या वर्षी 'त्रिशूल' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 'नूरी' चित्रपटाने त्यांना स्टारडम मिळवून दिलं. वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेक चढ-उतार आले. पती अशोक ठकारियासोबत मतभेद झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. पूनम यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला, पण दुसरं लग्न केलं नाही. त्यांच्या मते, मुलं हीच त्यांची प्राथमिकता होती.

kunal kamra audio clip tamilnadu
16 / 31

“तमिलनाडू कैसा पहुँचेगा भाई?” कुणाल कामराच्या फोनकॉलची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या 'नया भारत' शोमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर केलेल्या विडंबनपर गाण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाने संताप व्यक्त केला असून, हॅबिटॅट क्लबच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात शिवसेना कार्यकर्त्याचा फोन कॉल आहे. कामराने माफी मागण्यास नकार दिला असून, आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र शेअर केले आहे.

Actor karate expert Shihan Hussaini passed away
17 / 31

कर्करोगाशी झुंज अपयशी, कराटे अन् तिरदांजीत पारंगत अभिनेत्याचे निधन

प्रसिद्ध अभिनेते, कराटे व तिरंदाजी तज्ज्ञ शिहान हुसैनी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ६० वर्षांचे हुसैनी रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबियांनी फेसबुकवर दिली. चेन्नईतील निवासस्थानी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. हुसैनी यांनी १९८६ मध्ये 'पुन्नागाई मन्नन' चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

actress Amy Jackson blessed with baby boy
18 / 31

बॉलीवूड अभिनेत्री लग्नानंतर ७ महिन्यांनी झाली आई, बाळाचं नाव ठेवलं ‘ऑस्कर’, पाहा Photos

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन आई झाली आहे. तिने ब्रिटिश अभिनेता एडवर्ड वेस्टविकशी लग्न केल्यानंतर दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. अ‍ॅमीने इन्स्टाग्रामवर नवजात बाळाचे फोटो शेअर केले असून त्याचे नाव ऑस्कर अलेक्झांडर वेस्टविक ठेवले आहे. अ‍ॅमी व एडवर्ड २०२२ पासून एकत्र आहेत आणि २०२४ मध्ये त्यांनी इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केले होते.

Disha Salian and aaditya thackeray
19 / 31

दिशा सालियनला ओळखत होतात का? घटनास्थळी उपस्थित होतात का? आदित्य ठाकरे स्पष्ट म्हणाले…

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली असून, २ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राणे कुटुंबीयांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत या आरोपांना उत्तर देताना, "मी कोर्टातच बोलेन," असे सांगितले. त्यांनी आरोपांना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचे विधान केले आणि निवडणुका आल्यामुळे बदनामी सुरू असल्याचे म्हटले.

Eknath Shinde Reaction on Kunal Kamra Controversy
20 / 31

“…म्हणून मी रिॲक्ट झालो नाही”, कुणाल कामरा प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

विनोदी कलाकार कुणाल कामराच्या विडंबनगीतामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदे समर्थकांनी हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. शिंदे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत कामराच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले, "मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, त्याचा गैरफायदा घेतला जातोय."

Man moves to Bengaluru after 40% salary hike, says Rs 25 LPA is peanuts to live in IT capital
21 / 31

“पुण्यात किमान चांगलं आयुष्य जगत होतो”, २५ लाख वार्षिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा अनुभव

आजकाल नोकरी बदलणं सामान्य झालं आहे. पुण्यातील एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने २५ लाख वार्षिक पगारासाठी बंगळुरु गाठलं, पण तो आता पस्तावला आहे. त्याने मित्राला सांगितलं की, पुण्यात कमी पगारातही सुखात होतो. बंगळुरुतील महागाई, वाहतूक कोंडी आणि उच्च भाडे यामुळे त्रस्त आहे. त्याचा अनुभव मित्राने LinkedIn वर शेअर केला, ज्यामुळे चर्चा रंगली आहे.

athiya shetty kl rahul blessed with baby girl
22 / 31

अथिया शेट्टी-केएल राहुल झाले आई-बाबा, जोडप्याच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आई-बाबा झाले आहेत. अथियाने आज गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून या चिमुकल्या सदस्याच्या आगमनाची माहिती दिली आहे. आज, २४ मार्च रोजी, त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे.

smita patil raj babbar love story
23 / 31

विवाहित राज बब्बर यांनी स्मिता पाटीलसाठी पत्नीला सोडलं अन्…; ‘अशी’ होती दोघांची प्रेमकहाणी

स्मिता पाटील यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने खूप नाव कमावले. विवाहित राज बब्बर यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी लग्न केले. स्मिता यांच्या आई-वडिलांनी या लग्नाला विरोध केला होता. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या १५ दिवसांनी, ३१ व्या वर्षी स्मिता यांचे निधन झाले. राज बब्बर आणि स्मिता यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा लोकप्रिय अभिनेता आहे.

Which cricketer has Most expensive car in ipl its not rohit sharma or virat kohli
24 / 31

विराट कोहली, रोहित शर्मा नाही तर IPLमधील ‘या’ क्रिकेटरकडे आहे सर्वात महागडी गाडी

ऑटो 23 hr ago

Which cricketer has Most expensive car in IPL: देशात सध्या आयपीएलचा उत्साह पाहायला मिळतो आहे. क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहेत. तर एकीकडे प्रत्येक खेळाडूविषययी विविध चर्चा रंगताना दिसतेय. यातच आता क्रिकेटपटूंकडे असलेल्या महागड्या गाड्यांविषयी बोललं जात आहे. त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी ओळखले जाणारे क्रिकेटपटू, त्यांच्या कार कलेक्शनच्या बाबतीतही तशीच उत्कृष्ट निवड ठेवतात.

omar abdullah on waqf amendment bill 2024
25 / 31

“फक्त एका धर्माला लक्ष्य केलं जात आहे”, वक्फ बोर्ड विधेयकावर ओमर अब्दुल्लांचं टीकास्र!

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वक्फ (सुधारणा) विधेयक २०२४ वर टिप्पणी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) या विधेयकाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी या विधेयकामुळे फक्त एका धर्माला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. २६ मार्च रोजी पाटण्यात आणि २९ मार्च रोजी विजयवाड्यात AIMPLB चे सदस्य आंदोलन करणार आहेत. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवरून तणाव निर्माण झाला आहे.

Historian Indrajit Sawant Said This About Waghya Dog Tomb
26 / 31

“वाघ्याची समाधी म्हणजे छत्रपती शिवरायांना कमी लेखण्याचा..”; इंद्रजीत सावंत काय म्हणाले?

संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ मे पर्यंत हटवण्याची मागणी केली आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनीही वाघ्या कुत्र्याच्या समाधीला ऐतिहासिक आधार नसल्याचे सांगितले आहे. शिवप्रेमींनी यापूर्वीही ही मागणी केली होती. सावंत यांच्या मते, वाघ्या कुत्र्याची कथा राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून निर्माण झाली असून ती खोटी आहे. सरकारकडून यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

shani gochar surya grahan 2025
27 / 31

शनी गोचर, सूर्यग्रहणाच्या संयोगाने ५ दिवसांनी ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव

Surya Grahan 2025 And Shani Gochar : वैदिक पंचागानुसार, २९ मार्च रोजी शनीदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहणदेखील होणार आहे, ज्यामुळे सूर्यग्रहण आणि शनी गोचरमुळे दुर्मीळ संयोग होणार आहे, ज्यामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया, या भाग्यवान राशींविषयी…

ajay devgn maidaan was biggest disaster
28 / 31

अनेकदा बदलली रिलीज डेट, २५० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त ७१ कोटी

'मैदान' हा बॉलीवूड चित्रपट पाच वर्षांच्या विलंबानंतर प्रदर्शित झाला. फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या स्पोर्ट्स ड्रामाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अजय देवगण, प्रियामणी, गजराज राव यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीतही चित्रपट फ्लॉप ठरला. २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'मैदान'ने फक्त ७१ कोटींची कमाई केली. 'बडे मियाँ छोटे मियाँ'शी टक्कर झाल्यानेही चित्रपटाला फटका बसला.

Kunal Kamra RJ Malishka
29 / 31

“…मग मलिष्काचं गाणं का झोंबलं होतं?”, आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न!

कुणाल कामरा प्रकरणी सत्ताधारी आक्रमक झाले असून अंधेरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आदित्य ठाकरेंनी कामराची बाजू घेतली असून त्याने कोणाचंही नाव घेतलं नसताना कारवाई का व्हावी, असा प्रश्न विचारला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Kunal Kamra News, Uday Samant Vs Ambadas Danve
30 / 31

कुणाल कामराच्या मुद्द्यावरुन विधान परिषेदत राडा, नेमकं काय घडलं?

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली, ज्यामुळे शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली. विधानसभेत अंबादास दानवे यांनी या घटनेवर टीका केली, तर उदय सामंत यांनी कामराच्या विधानांचा निषेध केला. कामराने पंतप्रधान मोदींवरही टीका केली होती. या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ झाला आणि १०-१५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं.

PM Narendra Modi and Kunal Kamra
31 / 31

कुणाल कामराने उडवली पंतप्रधान मोदींची खिल्ली, गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींवर विडंबनात्मक गाणं म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. संजय निरुपम यांनी कामराने माफी मागावी अन्यथा योग्य उत्तर देऊ असे म्हटले आहे. कामराने मोदींना हुकूमशहा म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच, ईडी आणि सीबीआयवरही गाणं म्हटले आहे. या गाण्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.