लघवीमधून प्रचंड फेस येतोय? हे कोणत्या आजाराचे लक्षण तर नाही ना? वाचा डॉक्टर काय सांगतात
शरीर विविध आजारांचे संकेत आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांच्या माध्यमातून देत असते. यातील अनेक लक्षणं आपल्याला लघवीच्या माध्यमातूनही ओळखता येतात. जसे की, कावीळची लक्षणं अनेकदा लघवीच्या रंगावरून ओळखली जातात. अगदी त्याचप्रकारे काही आजारांची लक्षणंदेखील लघवीच्या माध्यमातून दिसून येतात. लघवीतून फेस येणं ही गोष्ट सामान्य असली तरी ती वारंवार होत असल्यास हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. परंतु, लोक हे सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष करतात.