तुम्हालाही सतत वाईट आठवणी येत राहतात? मग रात्रीची झोप यावर ठरू शकते रामबाण उपाय
Sleep can get rid of bad memories: नकारात्मक आठवणी जेव्हा आपल्या मनात येतात, तेव्हा त्या खूप त्रासदायक ठरू शकतात, ज्यामुळे आपली मानसिक स्थिती खराब होऊ शकते आणि आपली विचारशक्ती कमी होऊ शकते. २०२४ मध्ये ‘Psychological and Cognitive Sciences’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जागे असताना सकारात्मक आठवणी आठवण्यामुळे माणसांमध्ये नकारात्मक भावना आणि डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते.