Harsh Goenka : वजन कमी करण्यासाठी दोन महिने हर्ष गोयंका मधासह लिंबू पाणी प्यायले, पण…
Harsh Goenka : वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. त्यातलाच एक लोकप्रिय उपाय म्हणजे कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून पिणे. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. अनेकांच्या मते, या पेयाने दिवसाची सुरुवात केल्याने चयापचय क्षमता वाढते, फॅट्स कमी होते आणि शरीर सुदृढ होते. उद्योगपती व आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी मात्र या लोकप्रिय पेयाविषयी आपला अनुभव सांगितला आहे.