नारळाच्या दुधाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका होतो का कमी? आहारतज्ज्ञ काय सांगतात, वाचा
Coconut Milk Benefits : भारतीय खाद्यसंस्कृतीत नारळ हा महत्त्वाचा भाग आहे. अनेक पदार्थांमध्ये आपण नारळाच्या खोबऱ्याचे वापर करतो. विशेषत: कोकण आणि दक्षिण भारतातील पदार्थांमध्ये नारळाचा अधिक वापर दिसून येतो. कारण नारळात आरोग्यासाठी फायदेशीर अनेक पोषक घटक असतात. यातही नारळाचे दूध आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर मानले जाते. नारळाचे दूध केवळ स्वादिष्टच नाही तर ते पोषक तत्वांनीदेखील परिपूर्ण असते.