“चाळीशीत मला जास्त आनंदी वाटतं”, करीना कपूर खानने केला खुलासा
Kareena Kapoor feeling happy in 40s: करीना कपूर खानने नेहमीच वाढत्या वयात होणारे बदल मोकळ्या मनाने स्वीकारले आहेत. अमेरिकन अभिनेत्री व लेखिका गिलियन अँडरसनशी झालेल्या गप्पांमध्ये करीनाने तिच्या चेहऱ्यावरील फाईन लाइन्सबद्दल सांगितले.
“माझ्या चेहऱ्यावर इकडे-तिकडे असणाऱ्या लाइन्स मला खूप आवडतात. त्या काहीशा सेक्सी दिसतात. असं असलं तरी, मला असं वाटतं की, मी माझ्या चाळिशीमध्ये विशीपेक्षा जास्त आनंदी आहे,” असे करीना म्हणाली.