राजीव कपूरांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन कारणीभूत; हृदय, रक्तवाहिन्यांवर असा झाला परिणाम
अभिनेता राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा आणि अभिनेता राजीव कपूर यांचे २०२१ साली निधन झाले. राजीव कपूर यांना 'राम तेरी गंगा मैली हो गई' चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. पण, एक अभिनेता म्हणून त्यांना ही प्रसिद्धी फार काळ टिकवता आली नाही. राजीव कपूर हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे भाऊ आहेत, पण वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव कपूर हे अभिनेत्री खुशबू सुंदर यांचे चांगले मित्र होते. राजीव कपूर यांच्या निधनानंतर अलीकडेच खुशबू यांनी त्यावर भाष्य केले.