पावडर दुधाच्या सेवनाने मुलांना मधुमेहाचा धोका? वाचा, डॉक्टरांनी दिलेली महत्त्वाची माहिती
Powder Milk Side Effect For Children : बाळाच्या जन्मानंतर आईला दूध व्यवस्थित येत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डबाबंद दूध पावडर पाजली जाते. सध्या भारतात अशा प्रकारच्या दूध पावडरचे अनेक ब्रॅण्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही हॉस्पिटलमधील नवजात बाळांच्या वॉर्डमध्ये गेलात, तर तुम्हाला अनेक बेड्सजवळ असे दूध पावडरचे डबे दिसतील. नवजात बाळाचे पोट भरण्यासाठी या प्रकारचे दूध त्याला दिले जाते. हे पावडर दूध बाळासाठी पौष्टिक अन्न म्हणून दिले जाते.