“मला जिराफ म्हटलं जायचं”, अभिनेत्री सोनाली बेंद्रेला एकेकाळी करावा लागला होता टीकेचा सामना
बिग स्क्रीनवर फिल्म्सच्या कमबॅकप्रमाणेच, अनेक जुन्या सेलिब्रिटींच्या मुलाखतीही सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा समोर येत असतात. अशीच एक अभिनेत्री सोनाली बेंद्रेची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये लोकप्रिय असण्याबद्दल वक्तव्य केले आहे. खरे तर ही लोकप्रियता नकारात्मक होती. अभिनेत्रीने तिच्या दिसण्यावरून तिला कशी टीका सहन करावी लागली होती याबद्दल तिने सांगितले.