सनस्क्रीन लावताच डोळ्यांमध्ये जळजळ होते? मग तज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ सल्ला लक्षात ठेवा
उन्हाळा असो वा हिवाळा सनस्क्रीन वापरणं खूप महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन आपल्या स्कीनकेअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग असतो. तुम्हाला ग्लास फिनिश स्कीन हवी असेल किंवा त्वचेवरील तेल नियंत्रित करणारी मॅट फिनिश स्किन हवी असेल, तर सनस्क्रीनमध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स उपलब्ध आहेत. पण काही वेळा जेव्हा आपण सनस्क्रीन लावतो, तेव्हा डोळ्यांची जळजळ होऊ लागते आणि बाहेर जाताना जेव्हा आपण तयार होत असतो तेव्हा डोळ्यातून पाणी आलेलं कोणालाच आवडत नाही.