तुम्हीदेखील रताळे सोलून खाताय? मग करताय खूप मोठी चूक, तज्ज्ञांनी सांगितलं…
Sweet potato with skin: तुम्ही रताळे खाण्यापूर्वी ते सोलता का? रताळ्याची साल म्हणजे निसर्गाचं स्वतःचं संरक्षण कवच. ते केवळ रताळ्याच्या आतल्या भागाला ओलसर आणि ताजे ठेवत नाही तर त्यात आवश्यक पोषक तत्वेदेखील असतात, जी अनेकदा सोलल्यावर वाया जातात. Indianexpress.com ने रताळ्याच्या सालीचे सेवन करण्याचे पौष्टिक फायदे समजून घेण्यासाठी होलिस्टिक हेल्थ आणि वेलनेस कोच ईशा लाल यांच्याशी संपर्क साधला.