तुम्ही शौचालयात फोन वापरता? मग ही सवय आताच बदला; अन्यथा आरोग्यावर होतील हानिकारक परिणाम
Using Phone in Toilet: तुम्हालाही फोनची इतकी सवय लागलीय का की, तुम्हीदेखील शौचालयात फोन घेऊन जाता? यावरून अनेकदा तुम्हाला तुमच्या आईने नक्कीच दम दिला असेल आणि शौचालयात फोन वापरायलादेखील हरकत घेतली असेल. प्रत्येकाच्या आईप्रमाणेच वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील शौचालयात फोन वापरण्यास मनाई केली आहे. या लेखाद्वारे आपण पाच अशी मेंदुविकार तज्ज्ञांनी स्पष्ट केलेली कारणे जाणून घेणार आहोत, जी समजल्यावर तुम्ही तुमच्या आईचे म्हणणे लक्षात घ्याल आणि या वाईट सवयीच्या दुष्ट चक्रातून स्वत:ची सुटका करून घ्याल.