virat kohli Anushka Sharma monotrophic diet benefits in marathi
1 / 31

विराट-अनुष्काचा ‘मोनोट्रॉफिक डाएट प्लॅन’ ने वजन होते कमी? वाचा तज्ज्ञांचे मत

हेल्थ Updated: September 6, 2024 16:33 IST

Virat – Aanushka Monotrophic Diet Plan : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा तसेच फुटबॉल प्लेअर सुनील छेत्री यांसह अनेक खेळाडू, सेलिब्रिटी कंटाळा न करता अनेक महिने एकाच प्रकारचे अन्न खातात. अनुष्काने एका संभाषणात सांगितले की, माझ्यासाठी ही काही अवघड गोष्ट नाही, कारण मी जवळजवळ दररोज तेच खाते. विशेषत: जेव्हा मी चित्रपटाच्या चित्रीकरणात असते, तेव्हाही मी तेच खाते, तर काही काही वेळा मी रात्रीच्या जेवणात महिनाभर खिचडी आणि वांग्याची भाजी खाते. असेही तिने सांगितले होते.

Swipe up for next shorts
Success story of Manyavar founder Ravi Modi, who has built crores from being a salesperson to India's richest man
2 / 31

अवघ्या १३व्या वर्षी विकले कपडे अन् आज उभारलं कोटींचं साम्राज; वाचा रवी मोदींची यशोगाथा

करिअर September 16, 2024 12:54 IST

भारतीय तरुणांची जिद्द, त्यांची आवड अन् परिश्रम यामुळे अर्थव्यवस्थेत एक प्रकारचा इतिहासच घडत आहेत. आजकाल तरुण स्टार्टअप्स, व्यवसाय करण्यासाठी आपणहून पुढाकार घेत असले तरी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी जीवनातील अनुभव तुम्हाला खूप मोठी मदत करतो. असाच अनुभव गाठीशी घेऊन प्रसिद्ध उद्योजक रवी मोदी यांनी ‘वेदांत फॅशन्स’ अन् ‘मान्यवर’ची निर्मिती केली.

Swipe up for next shorts
manoj jarange patil (3)
3 / 31

“आजच तुम्हाला स्पष्ट सांगतोय, नंतर…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; मध्यरात्रीपासून…

महाराष्ट्र Updated: September 16, 2024 12:49 IST

गेल्या दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन व उपोषण करत आहेत. त्यांच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांनी राज्य सरकारला इशारा देत तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आणि बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकऱ्या देणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

Swipe up for next shorts
KL Rahul to Join RCB In IPL 2025 Gives Hint Saying Lets Hope so In Viral Video
4 / 31

केएल राहुल RCB मध्ये परतणार? स्वतःच दिले मोठे संकेत; VIDEO तुफान व्हायरल

क्रीडा September 16, 2024 11:17 IST

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सध्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीत आहे. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी सलग ३ हंगाम कर्णधार असलेल्या राहुलच्या संघातील भविष्याबाबत चर्चा सुरू आहे. त्याच्या जुन्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पुनरागमनाची शक्यता आहे. एका व्हिडिओमध्ये राहुलने आरसीबीमध्ये परतण्याची आशा व्यक्त केली आहे. लखनौ संघ त्याला रिलीज करेल अशीही शक्यता आहे.

Marathi Actor Suvrat Joshi Share Cab Driver interesting Experience
5 / 31

“मी हरखून गेलो…”, अभिनेता सुव्रत जोशीला कॅबमध्ये आला एक वेगळाच अनुभव, म्हणाला…

मनोरंजन Updated: September 16, 2024 11:09 IST

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदीत सुव्रतने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या सुव्रतचं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सुरू आहे. या नाटकात पत्नी, अभिनेत्री सखी गोखलेबरोबर तो पाहायला मिळत आहे. याच नाटकाच्या प्रयोगसाठी जात असताना सुव्रतला कॅबमध्ये एक वेगळाच अनुभव आला. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3 rare Raja Yogas will be created in september
6 / 31

‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग

राशी वृत्त September 16, 2024 11:00 IST

सप्टेंबर 2024 मध्ये तीन राजयोग निर्माण होणार आहेत: शश राजयोग (कुंभ), भद्र राजयोग (कन्या), आणि मालव्य राजयोग (तूळ). या योगांचा मेष, वृषभ, कन्या आणि कुंभ राशींवर शुभ प्रभाव पडेल. मेष राशीला धनलाभ, पगारवाढ, आणि कौटुंबिक आनंद मिळेल. वृषभ राशीला आर्थिक स्थैर्य, आरोग्य, आणि वैवाहिक सुख मिळेल. कन्या राशीला इच्छापूर्ती, शैक्षणिक यश, आणि भौतिक सुख मिळेल. कुंभ राशीला आकस्मिक धनलाभ, मान-सन्मान, आणि प्रवासाचे योग येतील.

Ireland Women Beat England Women Team by 5 wickets First Time in T20I
7 / 31

आयर्लंडच्या महिला संघाने इंग्लंडला पराभूत करत घडवला इतिहास

क्रीडा Updated: September 16, 2024 10:25 IST

इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ आयर्लंड दौऱ्यावर होता, जिथे त्यांनी ३ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले. इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत राहिली. १५ सप्टेंबरला डब्लिन येथे झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात आयर्लंडने प्रथमच इंग्लंडला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला. गॅबी लुईसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने १९.५ षटकांत १७० धावांचे लक्ष्य गाठले.

amit deshmukh on ncp ajit pawar group in latur
8 / 31

“मला दुबईच्या शेखची चिंता, त्याचाही पक्षप्रवेश…”, अमित देशमुखांची कवी संमेलनात टोलेबाजी…

महाराष्ट्र Updated: September 16, 2024 11:05 IST

महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्या गटांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. लातूरमध्ये रविवारी झालेल्या कवी संमेलनात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर कोपरखळ्या मारल्या. त्यांनी अजित पवार गटाचे विक्रम काळे व बाबासाहेब पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या विधानांमुळे सभागृहात हशा पिकला. देशमुखांनी लातूरमधील सत्तासमीकरणांवरही सूचक विधान केले.

Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble Emotional after watching daughter video
9 / 31

“तुझा एवढ्या दिवसांचा स्ट्राँग प्रवास पाहून…”, पंढरीनाथच्या मुलीने दिला धीर, म्हणाली…

मनोरंजन Updated: September 16, 2024 10:09 IST

रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सर्व सदस्यांना मोठं सरप्राइज दिलं. रितेशने सर्व सदस्यांना कुटुंबियांचा व्हिडीओ दाखवला. यावेळी पंढरीनाथ कांबळेला लेक ग्रिष्मा कांबळेचा व्हिडीओ दाखवण्यात आला. तिने या व्हिडीओतून आपल्या बाबाला धीर दिला आणि त्याच्या खेळाचं कौतुक केलं. ग्रिष्मा नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

Sbi recruitment 2024 notification in marathi
10 / 31

स्टेट बँकेत १५११ रिक्त पदांसाठी भरती, पगार ९३ हजार; पण ‘हेच’ उमेदवार करु शकतात अर्ज

करिअर Updated: September 16, 2024 10:03 IST

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी स्टेट बँकेने भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार उमेदवारांसाठी १४ सप्टेंबर २०२४ पासून sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जवळपास १५११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal Resignation Marathi News
11 / 31

अरविंद केजरीवाल राजीनामा देणार; आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती?

सत्ताकारण Updated: September 16, 2024 10:27 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा सुरू आहे. आम आदमी पक्षातील मंत्री अतिषी, गोपाल राय आणि कैलाश गहलोत यांची नावे चर्चेत आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत प्रकल्प रखडले आहेत, त्यामुळे नवीन मुख्यमंत्री लवकरच नेमण्याची गरज आहे. मनीष सिसोदिया यांनी मात्र चर्चेतून माघार घेतली आहे.

Raha Kapoor talking to dadi Neetu Kapoor video viral
12 / 31

Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून म्हणाली…

बॉलीवूड Updated: September 16, 2024 08:32 IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा लवकरच दोन वर्षांची होईल. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात राहाचा आवाज ऐकायला मिळतो. विमानतळावर नीतू कपूरला पाहून राहा खूप खूश झाली आणि टाळ्या वाजवू लागली. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

chhattisgarh mob lynching
13 / 31

जादूटोण्याचा संशय, तीन महिलांसह पाच जणांची बेदम मारहाण करून हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

देश-विदेश Updated: September 15, 2024 23:49 IST

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी जादू-टोण्याच्या संशयातून दोन दाम्पत्यांसह एका महिलेची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. मृतांमध्ये मौसम कन्ना, मौमस बिरी, मौसम बुच्चा, मौसम आरजू आणि काका लच्छी यांचा समावेश आहे. यापूर्वी जादू-टोण्याच्या संशयातून बलौदाबाजार-भाटपारा जिल्ह्यातही अशाच प्रकारे एका कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती.

Bigg Boss Marathi Season 5 pranit hatte reaction on nikki tamboli mother video
14 / 31

Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली…

मनोरंजन Updated: September 15, 2024 18:08 IST

शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ने आर्या जाधवला घराबाहेरचा रस्ता दाखवला. निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे 'बिग बॉस'ने आर्याला ही कठोर शिक्षा सुनावली. पण ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओतून तिने निक्कीच्या आईला सल्ला दिला आहे.

Success Story Of Dr Vikas Divyakirti
15 / 31

आयएएस पद सोडून स्वतःचं उभारलं कोचिंग सेंटर; वाचा लोकप्रिय विकास दिव्यकीर्ती यांची यशोगाथा

करिअर September 15, 2024 17:42 IST

डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी हरियाणातील भिवानी येथील सरस्वती शिशु मंदिरात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली आणि सहायक प्राध्यापक म्हणून करिअरला सुरुवात केली. १९९६ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गृह मंत्रालयात एक वर्ष काम केले, पण शिकवण्याची आवड असल्याने नोकरी सोडली. तर डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी कशाप्रकारे 'दृष्टी आयएएस' कोचिंग सेंटरची स्थापना केली जाणून घेऊ या…

aarya slapped nikki tamboli bigg boss marathi 5
16 / 31

आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुखने सांगितलं कारण

टेलीव्हिजन Updated: September 15, 2024 18:13 IST

बिग बॉस मराठी ५ मध्ये आर्याने कॅप्टन्सी टास्कमध्ये रागाच्या भरात निक्की तांबोळीला मारल्याने तिला घरातून निष्कासित करण्यात आले. होस्ट रितेश देशमुखने या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आर्याने तिची चूक मान्य केली आणि माफी मागितली. रितेशने स्पष्ट केले की, हिंसक दृश्ये प्राइम टाइमवर दाखवता येत नाहीत, म्हणून ती प्रेक्षकांना दाखवली नाहीत.

Arvind Kejriwal
17 / 31

केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री? ‘हे’ नेते आघाडीवर

देश-विदेश Updated: September 15, 2024 16:55 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटल्यावर दोन दिवसांत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीतून गोपाल राय, आतिशी मार्लेना, सौरभ भरद्वाज, कैलाश गहलोत, इम्रान हुसैन आणि सुनीता केजरीवाल यांच्या नावांची चर्चा आहे. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर हे सहा नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतील.

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul and her family welcome their baby boy
18 / 31

“आमचा छोटा सुपरहिरो आला…”, मायरा झाली ताई; श्वेता वायकुळ यांनी गोंडस मुलाला दिला जन्म

मनोरंजन September 15, 2024 16:17 IST

'झी मराठी'वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून प्रसिद्ध झालेली बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झाली आहे. तिच्या आईने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मायरा वायकुळने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

arvind kejriwal
19 / 31

“…म्हणून केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दोन दिवस मागितले”, भाजपाचा आरोप

देश-विदेश Updated: September 15, 2024 18:20 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. भाजपाने यावर प्रतिक्रिया देत, केजरीवाल दोन दिवसांत त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.

karan gunhyala mafi nahi fame harish dudhade share emotiona post
20 / 31

‘कारण गुन्ह्याला…’ मालिका लवकरच होणार ऑफ एअर, हरीश दुधाडेने भावुक होत म्हणाला…

मनोरंजन Updated: September 15, 2024 15:38 IST

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपूर्वी सुरू आहे. यामध्ये ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेचंही नाव आहे. अभिनेता हरीश दुधाडे, रुपल नंद, अश्विनी कासार, चंद्रलेखा जोशी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. मालिकेतील पोलीस निरीक्षक विजय भोसले म्हणजे अभिनेता हरीश दुधाडेने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 all Contends give majority to Arbaz Patel and decided Sangram Chougule as a Fuska bomb
21 / 31

संग्राम ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…

मनोरंजन Updated: September 15, 2024 14:37 IST

शनिवारी (१४ सप्टेंबर) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्या जाधव हिला घराबाहेर काढण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’कडून कठोर शिक्षा देण्यात आली. याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक जण ‘बिग बॉस’च्या निर्णयाचा निषेध करत आहेत. आजच्या (१५ सप्टेंबर) ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखसह घरातील सदस्य धमाल मस्ती करणार आहेत. याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

Rohit Sharma Doesnt Have the Best Technique Said Fielding Legend Jonty Rhodes
22 / 31

“रोहित तंत्रकुशल नाही”- जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला?

क्रीडा Updated: September 15, 2024 12:53 IST

मुंबई इंडियन्सचे माजी फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होर्ड्स यांनी रोहित शर्माबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला. ऱ्होर्ड्स म्हणाले की, रोहित नेटमध्ये सचिन तेंडुलकरसारखा कठोर सराव करत नाही, तरीही त्याने सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Ankur wadhave reaction on aarya jadhao thrown out of the house of slaping nikki
23 / 31

“निक्की बिग बॉस मराठी असं नाव घोषित करा”, आर्याला घराबाहेर काढल्यामुळे अभिनेता भडकला

मनोरंजन Updated: September 15, 2024 12:50 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये वाद झाला. आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे तिला थेट घराबाहेर काढण्यात आलं. या निर्णयावर अंकुर वाढवेने सोशल मीडियावर निषेध नोंदवला. तसंच अनेक नेटकऱ्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आर्याच्या चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी' पाहणं बंद केल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar praise Varsha Usgaonkar
24 / 31

Video: धनंजय पोवारने वर्षा यांचं हटके अंदाजात केलं कौतुक, रितेश देशमुखला झालं हसू अनावर

मनोरंजन Updated: September 15, 2024 13:32 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्यात आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे तिला घराबाहेर काढण्यात आले. यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले असून निक्कीला देखील शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे, 'भाऊच्या धक्क्या'वरील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये धनंजय वर्षा उसगांवकरांचं हटके अंदाजात कौतुक करताना दिसत आहे.

Jui Gadkari Answer to Fans who ask tharla tar mag will off air
25 / 31

‘ठरलं तर मग’ मालिका बंद होणार की वेळ बदलणार? जुई गडकरी म्हणाली…

मनोरंजन Updated: September 15, 2024 18:21 IST

'स्टार प्रवाह' वाहिनीवर दोन नव्या मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' आणि 'उदे गं अंबे' लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे 'ठरलं तर मग' लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर भाष्य केलं आहे. तिने चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

Neeraj Chopra Finishes 2nd in Diamond League Final Misses Title by Just 0 01 m
26 / 31

अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं नीरज चोप्राचं डायमंड लीग स्पर्धेचं जेतेपद

क्रीडा September 15, 2024 10:19 IST

नीरज चोप्राने ब्रुसेल्स डायमंड लीग २०२४ अंतिम फेरीत ८७.८६ मीटर थ्रोसह दुसरे स्थान मिळवले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर थ्रो करून पहिला क्रमांक पटकावला. नीरजने पहिल्या थ्रोमध्ये ८६.८२ मीटर, दुसऱ्या थ्रोमध्ये ८३.४९ मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये ८७.८६ मीटर, चौथ्या थ्रोमध्ये ८२.०४ मीटर, पाचव्या थ्रोमध्ये ८३.३० मीटर आणि शेवटच्या थ्रोमध्ये ८६.४६ मीटर थ्रो केला.

What Nitin Gadkari Said?
27 / 31

“तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आमचा पाठिंबा, त्या नेत्याने..”, गडकरींचं वक्तव्य चर्चेत

महाराष्ट्र Updated: September 15, 2024 10:18 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान होणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय नाही. ते त्यांच्या मूल्यं, विचार आणि संघटनेशी प्रामाणिक आहेत. २०१९ आणि २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या होत्या. तसेच, त्यांनी सुपारी पत्रकारितेचा एक किस्साही सांगितला.

Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh praised Pandharinath Kamble
28 / 31

“तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला..

मनोरंजन Updated: September 14, 2024 21:16 IST

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चांगलाच रंगला. छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून खेळलेल्या या कॅप्टन्सी टास्कमध्ये काही सदस्य चांगले खेळले. त्यापैकी एक म्हणजे पंढरीनाथ कांबळे. पंढरीनाथ यांनी अरबाज, वैभव सारख्या तगड्या सदस्यांना चांगलंच पळवलं. याचं कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार अशा अनेक कलाकारांनी केलं. त्यानंतर आता ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं भरभरून कौतुक केलं आहे.

aarya jadhao first post after Elimination
29 / 31

“निक्कीला तिची लायकी दाखवून आली…”, आर्या जाधवच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

टेलीव्हिजन Updated: September 15, 2024 10:19 IST

'बिग बॉस मराठी 5'च्या पाचव्या पर्वात आर्या जाधवला निक्कीला मारल्यामुळे घरातून निष्कासित करण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या झटापटीत आर्याने निक्कीला कानाखाली मारली होती. रितेश देशमुखने घटनाक्रम स्पष्ट केल्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढलं. घराबाहेर पडल्यावर आर्याने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली, ज्यात तिने लाल रंगाचा ब्रोकन हार्ट इमोजी वापरला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

Bigg Boss Eliminated Aarya for slapping Nikki
30 / 31

निक्कीला मारणं पडलं महागात, आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 22:01 IST

'बिग बॉस मराठी'च्या सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान वाद झाला. वादाच्या दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. या घटनेनंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रितेशने आर्याला निक्कीच्या वागण्यावरून तिला समज दिली आणि बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं.

Monstrous bodybuilder dies of heart attack
31 / 31

बॉडीबिल्डर इलिया गोलेमप्रमाणे दिवसातून 7 वेळा जेवल्यास शरीरावर काय परिणाम होतील? वाचा

हेल्थ September 14, 2024 19:10 IST

Monstrous Bodybuilder Lllia Yefimchyk Dies Of Heart Attack : जगप्रसिद्ध बेलारशियन बॉडीबिल्डर इलिया गोलेम येफिमचिक याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो अवघा ३६ वर्षांचा होता. शरीराच्या भारदस्त आकारामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात तो प्रचंड लोकप्रिय होता. यासाठी त्याला 'वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस बॉडीबिल्डर'ही पदवीदेखील मिळाली होती. सोशल मीडियावरही त्याचे लाखो फॉलोवर्स होते. तो जिममधील फोटोदेखील अनेकदा शेअर करायचा. इलिया ‘गोलेम’ येफिमचिक याला '340lbs बीस्ट', ‘द म्युटंट’ म्हणूनही ओळखले जात होते.