अजिंक्य रहाणे टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज! काउंटी चॅम्पियनशिपमध्ये झळकावले शतक
अजिंक्य रहाणेने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये लीसेस्टरशायरसाठी शतक झळकावले आहे. बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेने या शतकामुळे पुनरागमनाच्या आशा वाढवल्या आहेत. लीसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावात १९२ चेंडूत १०२ धावा करत त्याने संघाला ३०० धावांचा पल्ला गाठून दिला. रहाणेने भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी शतक झळकावल्याने त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या शक्यता वाढल्या आहेत.