२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहते म्हणाले…
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने स्कॉटलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने जिंकली. मालिकेनंतर कर्णधार मिचेल मार्शला दिलेली ट्रॉफी चर्चेचा विषय ठरली आहे. ही ट्रॉफी एका छोट्या वाडग्यासारखी होती, जी स्कॉटिश स्मरणिका म्हणून ओळखली जाते. व्हिडीओमध्ये मार्श आणि संघाचे खेळाडू हसताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असून चाहते स्कॉटलंड क्रिकेटला ट्रोल करत आहेत.