PAK vs BAN: बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक मालिका विजय! दुसऱ्या कसोटीतही लाजिरवाणा पराभव
बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळवला. रावळपिंडी कसोटीत बांगलादेशने ६ विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्या कसोटीत बांगलादेशने १० विकेट्सने विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीत लिटन दास १३८ धावा आणि मेहदी हसनच्या ७८ धावा या दोन्ही फलंदाजांनी चांगली खेळी केली. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात सर्व १० विकेट्स घेतल्या.