IPL 2023 मुळे BCCI मालामाल, तब्बल ५,१२० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई, पण GST तब्बल…
बीसीसीआयने आयपीएल २०२३ मधून ५१२० कोटी रुपये कमावले, जे आयपीएल २०२२ पेक्षा ११६ टक्के जास्त आहेत. बीसीसीआयचे २०२३-२४ मधील एकूण उत्पन्न ११,७६९ कोटी रुपये झाले असून खर्च ६६ टक्क्यांनी वाढून ६,६४८ कोटी रुपये झाला आहे. नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजकत्व करारामुळे ही वाढ झाली. बीसीसीआयने २०२३-२४ साठी २,०३८ कोटी रुपयांचा जीएसटी भरला आहे.