शुबमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? तिने शेअर केलेल्या दुबईतील ‘त्या’ फोटोंची चर्चा
क्रिकेटपटू शुबमन गिलच्या अफेअरच्या चर्चा नवीन नाहीत. अभिनेत्री रिद्धिमा पंडितनंतर आता त्याचं नाव अभिनेत्री अवनीत कौरशी जोडलं जात आहे. अवनीतने दुबईतील स्टेडियममधील फोटो आणि शुबमनच्या वाढदिवसाला पोस्ट शेअर केल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. अवनीतने 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर'पासून करिअरची सुरुवात केली आणि 'मर्दानी' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. शुबमन आणि अवनीतने अद्याप या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.