‘महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही?’, ‘छावा’पाहून माजी क्रिकेटपटूचा सवाल
अभिनेता विकी कौशलने 'छावा' चित्रपटात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लोकांना आवडत आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी चित्रपट पाहून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या विधानावर एक्सवर जोरदार चर्चा सुरू आहे. 'छावा' चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली असून, चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळत आहे.