‘बुमराह नसल्यामुळे आम्ही आनंदी’, संजना गणेशनसमोर बांगलादेशी फलंदाजाची कबुली
भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी बांगलादेशचा फलंदाज मेहदी हसन मिराजने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. बुमराहच्या पत्नी संजना गणेशनला दिलेल्या मुलाखतीत मिराजने बुमराहच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. दुखापतीमुळे बुमराह २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे.