चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक! भारताचे सामने कधी असणार? जाणून घ्या सामन्याची वेळ
आठ वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा २०२५ मध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तान यजमान असून भारताचे सामने दुबईत होणार आहेत. स्पर्धेत आठ संघ दोन गटांमध्ये विभागले आहेत. पहिला सामना पाकिस्तान वि न्यूझीलंड १९ फेब्रुवारीला होईल. उपांत्य फेरीसाठी दोन गटांतील अव्वल दोन संघ पात्र ठरतील. अंतिम सामना ९ मार्चला लाहोर येथे होईल, परंतु भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास सामना दुबईत होईल.