“विराटने किती जोर लावला तरीही टीम इंडिया हरणार”, म्हणणारा IIT बाबा नेटकऱ्यांच्या रडारवर
आयआयटी बाबाने टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती, पण विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. विराटच्या खेळीला शुबमन गिल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्याची साथ मिळाली. या विजयामुळे सोशल मीडियावर जल्लोष झाला आणि आयआयटी बाबाला ट्रोल करण्यात आले. विराटने १११ चेंडूत १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले.