GT vs RR: साई सुदर्शनने घडवला इतिहास, IPLमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज
गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या ८२ धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सवर ५८ धावांनी विजय मिळवला. साई सुदर्शन आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याने २०२४ मध्ये दोन आणि २०२५ मध्ये तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. यापूर्वी हा पराक्रम फक्त एबी डिव्हिलियर्सने केला होता.