जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! लॉर्ड्सवर झळकावले सलग दुसरे शतक
इंग्लंडच्या जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सलग दुसऱ्या डावात शतक झळकावले आणि ३४ शतकांसह इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला. रुटने ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला आहे. लॉर्ड्सवर २०१५ धावांचा ग्रॅहम गूचचा विक्रम मोडून रुटने २०२२ धावा केल्या आहेत.