KL Rahul on Koffee with Karan controversy
1 / 31

‘…अशी शिक्षा मला शाळेतही मिळाली नाही’, Koffee With Karan शोच्या वादावर राहुलचे वक्तव्य

क्रीडा Updated: August 25, 2024 13:35 IST

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलने ५ वर्षांपूर्वीच्या 'कॉफी विथ करण' शोमधील वादावर मौन सोडले आहे. त्या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे त्याला आणि हार्दिक पंड्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. राहुलने निखिल कामतच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, त्या घटनेनंतर त्याला शाळेतही कधी न मिळालेली शिक्षा मिळाली. कारण या वादामुळे त्याला संघातून निलंबित व्हावे लागले होते.

Swipe up for next shorts
Mangal gochar 2024 The persons of these three zodiac signs
2 / 31

पैसाच पैसा! मंगळ ग्रह होणार महाबली; ‘या’ राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय

राशी वृत्त September 13, 2024 12:04 IST

मंगळ गोचर 2024: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाने ऑगस्टमध्ये मिथुन राशीत प्रवेश केला असून ऑक्टोबरपर्यंत राहील. १६ सप्टेंबर रोजी मंगळाचे अंशबळ १२ डिग्री होणार आहे, ज्यामुळे वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, वैवाहिक सुख आणि आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात वाढ, नोकरीत प्रगती, गुंतवणुकीत फायदा आणि कुटुंबात आनंद मिळेल.

Swipe up for next shorts
Mann Dhaga-Dhaga Jodte Nava fame Mayuri Deshmukh doesn't like loud music in Ganesh Utsav
3 / 31

‘मन धागा-धागा…’ फेम मयुरी देशमुखला गणेशोत्सवातील ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही, म्हणाली…

मनोरंजन Updated: September 13, 2024 12:12 IST

‘खुलता कळी खुलेना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या 'स्टार प्रवाह'च्या 'मन धागा-धागा जोडते नवा'मध्ये पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी मयुरीची 'मन धागा-धागा जोडते नवा' मालिकेचे जबरदस्त एन्ट्री झाली. तिच्या एन्ट्रीमुळे या मालिकेला नवं वळणं मिळालं. या मालिकेत मुयरीने सुखदा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अल्पावधीत मयुरीने साकारलेली सुखदा घराघरात पोहोचली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीला गणेशोत्सवातील एक गोष्ट अजिबात आवडत नाही, याविषयी तिने नुकतंच परखड मत मांडलं आहे.

Swipe up for next shorts
Virat Kohli and Rohit Sharma arrived in Chennai
4 / 31

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, विराट-रोहितचा विमानतळावरील VIDEO व्हायरल

क्रीडा Updated: September 13, 2024 11:38 IST

बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ चेन्नईला पोहोचला आहे. १९ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार असून, त्याआधी सराव शिबिर होणार आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली हे खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. विराट कोहली लंडनहून थेट चेन्नईला पोहोचला. भारतीय संघात १६ खेळाडूंचा समावेश आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan remembers the village
5 / 31

Video: सूरज चव्हाणला येतेय गावची आठवण, म्हणाला, “मी साधा आणि सनकी आहे, पण इथे…”

मनोरंजन Updated: September 13, 2024 11:10 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू असून कॅप्टन्सीचा टास्क चालू आहे. अरबाज पटेल, धनंजय पोवार, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे कॅप्टन्सीसाठी उमेदवार आहेत. जान्हवी किल्लेकर आणि वैभवने 'जादुई हिरा' मिळवून अरबाज आणि सूरजला कॅप्टन्सीच्या टास्कमधून बाद केलं. आता धनंजय, वैभव आणि वर्षा यांच्यातील कोण कॅप्टन होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, सूरजला गावची आठवण येत आहे. गावाच्या आठवणीत रमत त्याने अंकिता व पंढरीनाथबरोबर गप्पा मारल्या.

Simran Budharup Shared Shocking Experience of Lalbaugcha Raja Darshan
6 / 31

Video: “धक्काबुक्की केली”, लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावर अभिनेत्रीने आला वाईट अनुभव

टेलीव्हिजन Updated: September 13, 2024 11:30 IST

'पंड्या स्टोअर' फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप लालबागचा राजाच्या दर्शनासाठी तिच्या आईबरोबर गेली होती. तिथे बाऊन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली, असा आरोप तिने केला आहे. सिमरनने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत हा अनुभव वाईट असल्याचे सांगितले. तिच्या आईचा फोन हिसकावला गेला आणि सिमरनने हस्तक्षेप केल्यावर तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले, असं तिने म्हटलंय.

Ireland all rounder Simi Singh
7 / 31

स्टार अष्टपैलू खेळाडूचा पत्नीमुळे वाचला जीव, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली यशस्वी

क्रीडा September 13, 2024 09:41 IST

आयर्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू सिमी सिंग यकृत निकामी झाल्याने त्रस्त होता आणि मेदांता, गुरुग्रामच्या आयसीयूमध्ये दाखल होता. त्याची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याची पत्नी आगमदीपने त्याला यकृत दान केले आहे. सिमी सिंगने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सिमी सिंग भारतीय वंशाचा असून त्याने आयर्लंडकडून ३५ एकदिवसीय आणि ५३ टी-२० सामने खेळले आहेत.

AFG vs NZ Test match abandoned
8 / 31

९१ वर्षात प्रथमच…कसोटी सामना एकही चेंडू न टाकता झाला रद्द! जाणून घ्या इतिहास

क्रीडा Updated: September 13, 2024 10:45 IST

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडामध्ये सततच्या पावसामुळे पाच दिवस एकही चेंडू टाकता आला नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदन जारी केले असून, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता सामना रद्द होण्याची ही आठवी वेळ आहे. १९९८ नंतर प्रथमच असा प्रकार घडला आहे.

wet sock method t For fever in children and adults
9 / 31

ताप आलाय? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल जादुई; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास होईल मदत

हेल्थ September 13, 2024 10:28 IST

सध्या हवामानात सतत बदल होत असल्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रात्री अचानक ताप आल्यावर आपल्यातील अनेक जण 'थंड पट्ट्या' डोक्यावर ठेवतात. पण, आज ताप कमी करण्यासाठी यासारखाच पण, थोडा ट्विस्ट असणारा एक उपाय कन्टेन्ट क्रिएटरने सांगितला आहे. तर हा उपाय नेमका कोणता आहे? याबद्दल डॉक्टरांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊ या…

Maharashtrachi Hasyajatra and chala hawa yevu dya fame actor actress had sudden met photo viral
10 / 31

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकारांची अचानक भेट, पाहा फोटो

मनोरंजन Updated: September 13, 2024 09:52 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' हे मराठीतील दोन लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे, तर 'चला हवा येऊ द्या'ने १० वर्ष मनोरंजन केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नुकतंच या दोन्ही कार्यक्रमातील कलाकारांची अचानक भेट झाली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसाद खांडेकरने हा फोटो शेअर करत लवकरच पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे.

west bengal governor ananda boase on mamata banerjee
11 / 31

ममता बॅनर्जींना राज्यपालांनी दिली ‘लेडी मॅकबेथ’ची उपमा; “मी त्यांच्यावर बहिष्कार टाकतो”

देश-विदेश Updated: September 13, 2024 10:45 IST

कोलकात्यातील आर. जी. कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यपाल आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत त्यांना 'लेडी मॅकबेथ'ची उपमा दिली. ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा केली.

dharmarao baba atram on daughter bhagyashree atram (1)
12 / 31

“त्यांनी नवीन वडील शोधलेत”, धर्मराव बाबा अत्राम यांची लेकीवर आगपाखड; म्हणाले, “मी त्यांना

महाराष्ट्र Updated: September 13, 2024 08:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी मुलगी भाग्यश्री अत्राम यांच्यावर टीका केली आहे. भाग्यश्री याांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने धर्मराव यांनी त्यांना खोचक शुभेच्छा दिल्या. त्यांनी भाग्यश्री यांच्या भाषेवर टीका करताना, त्यांना शिकवण्यात कमी पडल्याचं विधान केलं. तसेच, त्यांनी ५० वर्षं लोकांसाठी काम केल्याचे सांगून, भाग्यश्री यांच्या नव्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Mamata Banarjee Meet to Protesters
13 / 31

ममता बॅनर्जी आल्या, दोन तास थांबल्या, पण कोणीही आले नाही!

देश-विदेश September 12, 2024 19:54 IST

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितांच्या नातेवाईकांसह डॉक्टरांनी पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते, परंतु कोणीही हजर झाले नाही. ममता बॅनर्जी यांनी चर्चेचे थेट प्रक्षेपण नाकारले, परंतु रेकॉर्डिंगची तयारी दर्शवली. आंदोलकांनी ठोस अटी ठेवल्याने तिसरी बैठकही निष्फळ ठरली. तृणमूल काँग्रेसने भाजपावर लोकशाही चर्चेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

Broccoli Or Cauliflower - Which Is Healthier?
14 / 31

ब्रोकोली की फ्लॉवर ? आरोग्यासाठी कोणती भाजी जास्त फायदेशीर; जाणून घ्या

लाइफस्टाइल September 12, 2024 19:27 IST

ब्रोकोली आणि फ्लॉवर या भाज्यांमध्ये कोणती अधिक आरोग्यदायी आहे हे ठरवणे कठीण आहे. पोषणतज्ञ मंजू मलिक यांच्या मते, ब्रोकोली फायबर आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, तर फ्लॉवरमध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त आहे. ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे अधिक आहेत. दोन्ही भाज्या पौष्टिक असून, आपल्या पोषणाच्या गरजेनुसार त्यांचा आहारात समावेश करावा.

Team India WTC final 2025 qualification scenario
15 / 31

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील?

क्रीडा Updated: September 12, 2024 18:09 IST

भारतीय क्रिकेट संघ पुढील आठवड्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे, जे २०२३-२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी महत्त्वाचे आहेत. सध्या भारत ६८.५२% विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला पुढील १० पैकी किमान ७ सामने जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

16 / 31

“आपण तीन दहशतवाद्यांना सोडलं अन् आता…”, IC814 विमान अपहरणावर फारुक अब्दुल्लांचं वक्तव्य

देश-विदेश Updated: September 12, 2024 19:24 IST

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आय सी ८१४: दी कंदहार हायजॅक' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला जाणारं विमान पाच दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं. भारत सरकारने तीन दहशतवाद्यांच्या बदल्यात प्रवासी आणि क्रू सदस्यांची सुटका केली. दरम्यान, फारुक अब्दुल्लाह यांनी या निर्णयावर टीका केली आहे, ते म्हणाले, दहशतवाद्यांना सोडून आपण मोठी चूक केली.

Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
17 / 31

आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?

निवडणूक २०२४ Updated: September 12, 2024 17:13 IST

इल्तिजा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या आईचे सोशल मीडिया हँडल चालवले आणि माध्यम सल्लागार म्हणून काम केले. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आणि यूकेच्या वॉर्विक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर शिक्षण घेतले. आता त्या बिजबेहरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

New Hero Destini 125 vs TVS Jupiter 110 Features Comparison in Marathi
18 / 31

New Hero Destini 125 आणि TVS Jupiter 110 नव्या फीचर्ससह लाँच, कोणती स्कूटर ठरणार वरचढ?

ऑटो Updated: September 12, 2024 17:05 IST

Features Comparison of New Hero Destini 125 vs TVS Jupiter 110: फॅमिली स्कूटर सेग्मेंटने दोन नवीन स्कूटर लाँच केल्या आहेत. New Hero Destini 125 आणि TVS Jupiter 110 ही दोन नावे काही आपल्यासाठी नवीन नाहीत; परंतु या दोन्ही स्कूटर्सचे अपडेट्स नवीन आहेत. या दोन्ही स्कूटर्स आता डिझाइन्स आणि फीचर्सच्या बाबतीत अपडेट झाल्या आहेत.

Sadhguru says going to bed ‘with a full stomach’ may cause backache; an expert weighs in
19 / 31

पोटभर जेवल्यानंतर लगेच झोपू नका! पाठदुखी टाळण्यासाठी सदगुरुंचा सल्ला, तज्ज्ञ काय सांगतात?

हेल्थ Updated: September 13, 2024 10:56 IST

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला झोपेतून उठल्या उठल्या पाठदुखी होत असेल तर त्याचे कारण जेवल्यानंतर लगेच झोपणे हे असू शकते. तुमचे पोट भरलेले असताना तुम्ही जाऊन सरळ झोपता, त्यामुळे मणक्यावर दाब पडतो आणि ते अनेक अवयवांना कार्य करू देत नाही,” असे सद्गुरु यांनी सांगितले. पाठदुखी टाळण्यासाठी सद्गुरुंनी दिलेल्या या सल्ल्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, याबाबत इंडियन एक्स्प्रेसने जाणून घेतले आहे.

CPI(M) General Secretary Sitaram Yechury died at 72 in delhi marathi news
20 / 31

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन

देश-विदेश Updated: September 12, 2024 16:49 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. येचुरी यांनी वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठी अनेक आंदोलनं केली. १९७४ साली एसएफआयमध्ये प्रवेश करून १९८४ साली माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. २०१५ साली ते माकपचे महासचिव झाले आणि १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं.

AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
21 / 31

२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहते म्हणाले…

क्रीडा Updated: September 12, 2024 15:58 IST

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने स्कॉटलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने जिंकली. मालिकेनंतर कर्णधार मिचेल मार्शला दिलेली ट्रॉफी चर्चेचा विषय ठरली आहे. ही ट्रॉफी एका छोट्या वाडग्यासारखी होती, जी स्कॉटिश स्मरणिका म्हणून ओळखली जाते. व्हिडीओमध्ये मार्श आणि संघाचे खेळाडू हसताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असून चाहते स्कॉटलंड क्रिकेटला ट्रोल करत आहेत.

How to Apply for Ladki Bahin Yojana Scheme Offline in Marathi
22 / 31

ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

महाराष्ट्र Updated: September 12, 2024 15:49 IST

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यवधी अर्ज आल्याने सप्टेंबरमध्येही अर्ज करण्याची संधी देण्यात आली. मात्र, आता फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू शकणार आहेत. नारी शक्ती अॅप आणि संकेतस्थळ बंद असल्याने महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्यावा लागणार आहे. पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत.

IND vs BAN Test Series updates in marathi
23 / 31

भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम

क्रीडा Updated: September 12, 2024 15:10 IST

बांगलादेशने भारत दौऱ्यासाठी आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत शकीब अल हसनला संघात कायम ठेवण्यात आले असून, अनकॅप्ड फलंदाज जॅकर अली अनिकचा समावेश केला आहे. वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला चेन्नईत, तर दुसरा २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये होणार आहे.

kirit somaiya on letter to raosaheb danve
24 / 31

किरीट सोमय्या म्हणाले, “त्या पत्राचा विषय आता संपला”; पक्षादेश धुडकावल्यानंतर स्पष्टीकरण!

महाराष्ट्र Updated: September 12, 2024 13:40 IST

गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे नेते किरीट सोमय्या चर्चेत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना प्रचार समिती सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. त्यांनी पक्षाकडून अवमानास्पद वागणूक मिळाल्याचे पत्रात नमूद केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. सोमय्यांनी स्पष्टीकरण देत हा विषय संपल्याचे सांगितले आणि पक्षाची इतर कामे करत राहणार असल्याचे नमूद केले.

Social media for kids
25 / 31

“लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार

देश-विदेश Updated: September 12, 2024 13:29 IST

ऑस्ट्रेलिया सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियामुळे मुलांचा स्क्रिनिंग टाईम वाढतो आणि बौद्धिक विकासात अडचणी येतात. पालकांच्या मागणीमुळे आणि विरोधकांच्या आश्वासनामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान अॅन्थोनी अल्बानिस यांनी मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पालकांना समर्थन देण्यासाठी हा कायदा आणण्याचं आश्वासन दिलं आहे.

Success Story of DSP Santosh Kumar Patel:
26 / 31

एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा

करिअर September 12, 2024 12:50 IST

प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत घेत असतो. कितीही अपयश आलं, संकटं आली तरी ती मागे टाकून, सतत पुढे जाण्याची जिद्द आणि आशा त्याच्याकडे असली की सगळं काही शक्य होतं. अशाच संघर्षाला सामोरं जात विटा उचलण्याच्या कामापासून ते डीएसपी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास संतोष कुमार पटेल यांनी केला आहे.

himachal pradesh ragging video
27 / 31

Video: दारू प्यायला नाही, म्हणून ज्युनिअर विद्यार्थ्याला सीनिअर्सकडून मारहाण; रात्रभर…

देश-विदेश Updated: September 12, 2024 12:48 IST

हिमाचल प्रदेशच्या बाहरा विद्यापीठात एका ज्युनिअर विद्यार्थ्याला रॅगिंगच्या प्रकारात मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रजत नावाच्या विद्यार्थ्याला दारू न प्यायल्यामुळे सीनिअर विद्यार्थ्यांनी रात्रभर मारहाण केली. विद्यापीठाने आरोपींवर कारवाई करत दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. पोलिसांनीही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

AUS vs ENG Travis Head scored 30 runs in sam curran over video viral
28 / 31

४,४,६,६,६,४…ट्रॅव्हिस हेडकडून सॅम करनची धुलाई! एकाच षटकात कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

क्रीडा Updated: September 12, 2024 18:07 IST

साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २८ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने १७९ धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंड १५१ धावांवर गारद झाला. ट्रॅव्हिस हेडने ५९ धावांची स्फोटक खेळी करत सॅम करनच्या एका षटकात ३० धावा कुटल्या. हेडने १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
29 / 31

पीडीपीच्या बालेकिल्ल्यात मेहबुबा मुफ्तींची लेक रणांगणात! इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या…

निवडणूक २०२४ Updated: September 12, 2024 17:30 IST

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इल्तिजा यांनी मतदारांना आवाहन केले की त्यांनी त्यांना एक व्यक्ती म्हणून पाहावे. त्यांनी रोजगाराच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. पीडीपीचे प्रवक्ता नजमू साकीब यांनी सांगितले की, पक्षाला ८-१० जागांवर समाधान मानावे लागेल आणि ते सत्तेचे दावेदार नाहीत.

Kieron Pollard scored a half century in 19 balls in CPL 2024
30 / 31

रिटायरमेंट मागे घेऊन पोलार्ड मुंबई इंडियन्सकरता IPL 2025 मध्ये खेळताना दिसणार?

क्रीडा Updated: September 12, 2024 13:50 IST

आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे, ज्यात संघांना फक्त चार ते पाच खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यामुळे सर्व संघांना पुनरबांधणी करावी लागणार आहे. किरॉन पोलार्ड, जो मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे, त्याच्या स्फोटक खेळीमुळे चर्चेत आला आहे आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. पोलार्डने २०१० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले होते आणि त्याने २११ सामन्यांत ३९१५ धावा आणि ७९ विकेट्स घेतल्या आहेत.

Mashrafe Bin Mortaza his father and 90 others are accused
31 / 31

बॉम्बस्फोट आणि गोळीबार प्रकरणात बांगलादेशच्या माजी कर्णधाराचे नाव, FIR दाखल

क्रीडा Updated: September 12, 2024 10:42 IST

बांगलादेशातील आंदोलनानंतर क्रिकेटर शकीब अल हसनवर हत्येचा आरोप आहे. आता माजी कर्णधार मशरफे मुर्तझावरही गुन्हा दाखल झाला आहे. ढाक्यातील विद्यार्थ्यांवर हल्ल्याप्रकरणी नरिल सरदार पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मुर्तझाच्या वडिलांचाही समावेश आहे. सरकार उलथून टाकल्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला. मशरफे लवकरच यूएस टी-१० लीगमध्ये खेळणार आहे.