Paris Olympic: एक किलोच्या फरकानं मीराबाई चानूनं पदक गमावलं; आणखी एक स्वप्न भंगलं!
कुस्तीपटू विनेश फोगट १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीआधीच अपात्र ठरली, ज्यामुळे भारताचे निश्चित पदक हुकले. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला कांस्यपदक मिळवण्यात अपयश आले. अवघ्या एक किलोच्या फरकाने ती चौथ्या स्थानावर राहिली. चीनच्या कोऊ झिहुईने सुवर्णपदक, रोमेनियाच्या व्हॅलेंटिनाने रौप्यपदक आणि थायलंडच्या सुरोचनाने कांस्यपदक जिंकले.