जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
भारताचा बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेश याने १८ व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डिंग लिरेनला हरवून त्याने इतिहास रचला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुकेशचे अभिनंदन करताना बुद्धिबळाच्या खेळाच्या वृद्धीची इच्छा व्यक्त केली. अंतिम डावात डिंगच्या चुकांमुळे गुकेशला विजय मिळाला. गुकेशने या ऐतिहासिक क्षणासाठी देवाचे आभार मानले.