VIDEO:“हा कसला एअर शो…” कराचीतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू घाबरले
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला. कराची नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यात पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी एअर शो केला. अचानक सुरू झालेल्या या शोमुळे खेळाडू आणि चाहते दचकले. न्यूझीलंडने ३२० धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २६० धावांवर सर्वबाद झाला.