चॅम्पियन्स ट्रॉफीत मर्दुमकी गाजवणाऱ्या टीम इंडियाची ना मिरवणूक ना सत्कार; नेमकं कारण काय?
गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं विजेतेपद मिळवलं होतं आणि त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. मात्र, यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही खेळाडूंचं स्वागत किंवा मिरवणूक होत नाहीये. IPL मुळे खेळाडूंना वेळ कमी मिळाल्याने कौतुक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. कर्णधार रोहित शर्मा मुंबईत परतला असताना चाहत्यांनी विमानतळावर त्याचं स्वागत केलं.