PAK vs BAN : पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मुशफिकर रहीमने घेतला मोठा निर्णय
बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात मुशफिकर रहीमने १९१ धावांची शानदार खेळी करत सामनावीराचा किताब मिळवला. यानंतर त्याने बक्षिसाची रक्कम बांगलादेशच्या पूरग्रस्तांना दान केली. संध्या बांगलादेशमध्ये अतिवृष्टीमुळे प्रभावित लोकांना मदतीची गरज आहे.