पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला बांगलादेशकडून १० विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने ३० धावांचे लक्ष्य दिले होते, जे बांगलादेशने ६.३ षटकात पूर्ण केले. या विजयामुळे बांगलादेश डब्ल्यूटीसी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला, तर पाकिस्तान आठव्या स्थानावर घसरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे अव्वल दोन स्थानांवर कायम आहेत.