“ICC नं आम्हाला आरसा दाखवला”, कामरान अकमल पाकिस्तान संघावर भडकला; म्हणाला, “आमची तिथे…”
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने विजेतेपद मिळवले, तर पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक ठरली. पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक कामरान अकमल यांनी संघावर टीका केली. अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानचे पदाधिकारी व्यासपीठावर नसल्याने आयसीसीने त्यांना हद्दपार केल्याची चर्चा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत तक्रार केली असून आयसीसीने शिष्टाचाराचे कारण दिले आहे.