राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, ‘या’ संघाला १६ वर्षानंतर ट्रॉफी जिकून देणार!
आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. द्रविड पूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकही राहिला आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर ही घोषणा केली. द्रविडने सांगितले की, विश्वचषकानंतर हे नवीन आव्हान स्वीकारण्याची योग्य वेळ आहे. तसेच राजस्थान रॉयल्सला १६ वर्षांनंतर ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे.