RCB च्या पोरींनी घडवला नवा इतिहास, WPL च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
वुमन्स प्रीमियर लीग २०२५ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि गुजरात जायंट्स (जीजी) यांच्यात झाला. आरसीबीने ६ विकेट्सने आणि ९ चेंडू राखून विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २०१ धावा केल्या, ज्यात अॅश्ले गार्डनरने ७९ धावांची खेळी केली होती. आरसीबीकडून एलिस पेरीने ५७ धावा केल्या, तर रिचा घोषने ६४ धावांची खेळी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आरसीबी वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा संघ ठरला आहे.