मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरिसमध्ये घडवला इतिहास, गोळाफेकमध्ये पटकावलं रौप्य पदक
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या सचिन सर्जेराव खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले. सचिनने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले. सचिन हा ४० वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यामुळे भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे.