“आचरेकर सरांच्या कर्मभूमीत…” शिवाजी पार्कमध्ये होणार सचिन तेंडुलकरच्या गुरूंचे स्मारक
भारताला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखा महान क्रिकेटपटू देणारे स्वर्गीय रमाकांत आचरेकर सर यांचे स्मारक मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये उभारले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आचरेकर सरांचा फोटो शेअर केला आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. आचरेकर सरांनी अनेक क्रिकेटपटूंना घडवले, ज्यात तेंडुलकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांचा समावेश आहे.