जोश इंगलिसने ४३ चेंडूत झळकावले शतक, फक्त षटकार-चौकारांसह केल्या ७० धावा
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिसने स्कॉटलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४३ चेंडूत शतक झळकावले, आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक ठरले. त्याने ॲरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेलचा विक्रम मोडला. इंगलिसने ४९ चेंडूत १०३ धावा केल्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने १९६ धावा केल्या आणि स्कॉटलंडला १९७ धावांचे लक्ष्य दिले.