स्वप्नील कुसाळेच्या वडिलांचा शिंदे सरकारवर आरोप;म्हणाले,”सामान्य कुटुंबातला असल्यामुळेच..”
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला. महाराष्ट्र सरकारने त्याला एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं, पण त्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी पाच कोटींचं बक्षीस मागितलं आहे. त्यांनी राज्य सरकारवर पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. स्वप्निलच्या आगामी खर्चासाठी अधिक आर्थिक मदतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.