“आता खूप झालं”, गौतम गंभीर वैतागला; चौथ्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला धरलं धारेवर!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पहिल्या सामन्यानंतर चांगली कामगिरी करता आलेली नाही. चौथ्या सामन्यात १८४ धावांनी पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरनं खेळाडूंना धारेवर धरलं आहे. गंभीरनं खेळाडूंना मोकळीक दिली होती, पण आता नियोजनानुसार खेळण्याची सक्ती केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.