सचिन तेंडुलकर होता थर्ड अंपायरने बाद दिलेला पहिला खेळाडू! निर्णयाची ही पद्धत कधी सुरू झाली
क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर प्रणालीची सुरुवात १९९२ साली झाली. मैदानावरील पंचांच्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तंत्रज्ञानाच्या आधारे निर्णय घेतले जातात, जसे स्निकोमीटर, हॉक आय, अल्ट्राएज इत्यादी. सचिन तेंडुलकर हा थर्ड अंपायरने बाद दिलेला पहिला खेळाडू होता. यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद निर्माण झाला, ज्यामुळे थर्ड अंपायर प्रणालीची चर्चा पुन्हा रंगली.