तिलकच्या शतकाचं आवेशने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्या म्हणाला, “बेस्ट बर्थडे गिफ्ट”
दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीत भारत ए आणि भारत डी यांच्यातील सामन्यात तिलक वर्माने शतक झळकावले. पहिल्या डावात फेल ठरलेल्या तिलकने तिसऱ्या दिवशी शानदार खेळी केली. प्रथम सिंगनेही शतक झळकावले. तिलकच्या शतकावर आवेश खानने खास सेलिब्रेशन केले. सूर्यकुमार यादवने तिलकच्या शतकावर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कौतुक केले.