ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ट्रॅव्हिस हेडने विस्फोटक फलंदाजी करत रोहित शर्माचा विक्रम मोडला. इंग्लंडने ३१५ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ३१६ धावांचे लक्ष्य ४४ षटकांत पार केले. हेडने १२९ चेंडूंमध्ये १५४ धावा केल्या. हेडने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्यांदा १५० हून अधिक धावा केल्या, असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला.