VIDEO: “कबुतरासारखा उड्या मारत असतो…”, मोहम्मद रिझवानवर भारतीय अंपायरचं मोठं विधान
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा उत्कृष्ट खेळाडू असून, त्याच्या सततच्या अपीलमुळे पंचांना त्रास होतो. भारतीय पंच अनिल चौधरी यांनी सांगितले की, रिझवानच्या अपीलकडे ते लक्ष देत नाहीत. रिझवानच्या अपीलमुळे पाकिस्तानी कर्णधार डीआरएस घेतो, पण तो नॉटआऊट ठरतो. चौधरी यांनी सर्व विकेटकिपर्सना विनाकारण अपील न करण्याचा इशारा दिला आहे.