Video: सचिन तेंडुलकरनं सांगितली वैभव सूर्यवंशीच्या अविश्वसनीय खेळीची ‘रेसिपी’; म्हणाला…
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं १६व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. त्याचप्रमाणे, १४व्या वर्षी वैभव सूर्यवंशी यानं राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात ३५ चेंडूंमध्ये शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले. सचिननं वैभवच्या खेळीचं कौतुक करत त्याच्या खेळण्याची निडर पद्धत आणि फटका मारतानाचा बॅटचा वेग याची प्रशंसा केली. वैभव भावनिक होत सचिनच्या कौतुकाला उत्तर दिलं.