माझ्या सरावासाठी आई पहाटे २ वाजता उठायची, वडिलांनी नोकरी सोडली – वैभव सूर्यवंशी
आयपीएल २०२५ मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत दुसरं सर्वात वेगवान शतक ठोकलं. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत वर्ल्ड रेकॉर्ड केला. वैभवने यशाचं श्रेय कुटुंबाला दिलं, ज्यांनी त्याच्या सरावासाठी मोठे त्याग केले. राजस्थान रॉयल्सने १.१ कोटींची बोली लावून त्याला संघात घेतलं. वैभवने इशांत शर्मासारख्या गोलंदाजांवर वादळी फटकेबाजी केली.